e0d43141a067e714ffd2fde6db3aff37a63618f03435c6939d6bdd7e4a4057ac.0

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचं आज बिगुल वाजणार आहे. दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामध्ये १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, रायगड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे.

राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन झेडपी निवडणूक जाहीर करणार आहे. झेडपी निवडणुका 2 टप्प्यात
होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 50 टक्क्यांच्या आत
आरक्षण असलेल्या झेडपींची निवडणूक तर 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झेडपीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *