राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं राज्य निवडणूक आयोग दखल घेतलीय. यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगानं दिल्याची माहिती आहे. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची
विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर राज्य निवडणूक आयोगाने काय आदेश दिलेत ते पाहुयात ठळक मुद्दयांमधून…
- निवडणूक आयोगानं बिनविरोध निवडीचा अहवाल मागवला
- निवडणूक आयोगानं दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
- दबावाच्या तक्रारींची शाहनिशा होणार आहे.
- ठाणे आणि पनवेल महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवर विशेष लक्ष
- भयमुक्त निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सतर्क
