राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदारांना मतदान करता येणार आहे. राज्यभरात एकूण 2,869 जागांसाठी ही निवडणूक होत असून 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदानासाठी 39 हजार 92 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण 15 हजार 908 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग चार सदस्यीय असून काही प्रभाग तीन किंवा पाच सदस्यीय आहेत. प्रभागातील सदस्यसंख्येनुसार मतदारांना तितकी मते द्यावी लागणार असून ईव्हीएमवर चार वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका असतील. या निवडणुकीचा निकाल उद्या, 16 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे.
