20260206 213137 scaled

सांगोला ; तालुका प्रतिनिधी

जवळा जिल्हा परिषद गटाची निवडणूक ऐन रंगात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अतुल पवार यांनीच घड्याळाला मत न देता कमळ आणि धनुष्यबाणाला मतदान करा असा अजब प्रचार केल्याने जवळा गटातील सर्व कार्यकर्ते सध्या संभ्रमात आहेत.

जवळा जिल्हा परिषद गटात असणाऱ्या जवळा आणि वाढेगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ या चिन्हावर दोन उमेदवार उभे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अतुल पवार हे वाढेगाव पंचायत समिती गणातून सीमा नवनाथ तोरणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत या गणातून अतुल पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध करत थेट शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या राणी गजानन उबाळे यांचा प्रचार केला आहे तर जवळा पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तृप्ती प्रशांत यादव यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या भरती लालासाहेब देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अतुल पवार मत मागत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अतुल पवार यांनी सांगोल्यात शक्तीप्रदर्शन करून जिल्हा परिषदेच्या जागेसाठी स्वतःचा तर जवळा पंचायत समिती गणातून तृप्ती प्रशांत यादव तर वाढे गाव पंचायत समिती गणातून सीमा नवनाथ तोरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु यानंतर झालेल्या राजकीय वाटाघाटीत त्यांनी स्वतःची जागा महायुतीमधून मिळवली आणि आपल्या सोबत पंचायत समितीच्या निवडणुक रिंगणात उतरलेल्या दोन्ही उमेदवारांना वाऱ्यावर सोडले या घटनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे.

मालक, अजितदादांच्या आत्म्याला काय वाटत असेल..?

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वाढेगाव येथून प्रचाराला शुभारंभ करत असताना जवळा जिल्हा परिषद गटातून घड्याळाला मत देऊन अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करूया असे विधान अतुल पवार यांनी केले. मात्र, याचवेळी जवळा पंचायत समितीच्या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर उभ्या असणाऱ्या तृप्ती प्रशांत यादव आणि वाढेगाव गणातील सीमा नवनाथ तोरणे यांच्याविरोधात उभ्या असणाऱ्या कमळ आणि धनुष्यबाण चिन्हाला मत देण्याचे त्यांनी आवाहन केले. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्षच आपल्याच पक्षाच्या दोन उमेदवारांच्या विरोधात घड्याळाच्या विरोधात प्रचार करत असेल तर स्व अजितदादांच्या आत्म्याला काय वाटत असेल ? असा सवाल आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांतून पुढे येऊ लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *