IMG 20260127 WA0017 scaled

सांगोला ( प्रतिनिधी )

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे सन २६-२७ हे अमृत महोत्सवी वर्ष आहे.यानिमित्त बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत संभाजी कदम बास्केटबॉल स्पोर्ट्स अकॅडमी ( सांगोला तालुका शहर व तालुका बास्केटबॉल असोसिएशन संलग्न) उद्घाटन प्रजासत्ताक दिनी भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक संभाजी कदम यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व प्रतीकात्मक बास्केट करून अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी संस्थाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, सदस्य चंद्रशेखर अंकलगी, संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमी पुणे संचालक व प्रशिक्षक शरद नागणे, गणेश नागणे, सागर कदम, सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुहास होनराव, सचिव प्रशांत मस्के, प्रशांत दौंडे,प्राचार्य अमोल गायकवाड, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते .

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  संभाजी कदम भारतीय सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत असून राष्ट्रीय बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक आहेत. याच मैदानावर खेळून पुढे आलेल्या कदम यांनी सांगोल्यातील खेळाडूंना मार्गदर्शन मिळावे, त्यांचा वेळ, पैसा आणि ऊर्जा योग्य दिशेने लागावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि कौशल्य प्राप्त व्हावे व राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची उत्तुंग कामगिरी व्हावी या उद्देशाने ही अकॅडमी स्थापन केल्याचे सांगत या अकॅडमीसाठी संस्था अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले

संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी संस्थेचा व १९८२ पासून अखंड सुरू असलेल्या बास्केटबॉल स्पर्धेचा इतिहास उलगडून सांगत ग्रामीण भागात बास्केटबॉल खेळ रुजवण्याचे कार्य केले आहे.संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रात उचललेले हे पाऊल सांगोला तालुक्यातील खेळाडूंसाठी नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला पदाधिकारी, सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे  पदाधिकारी, क्रीडाप्रेमी, प्रतिष्ठित नागरिक, विद्यामंदिर परिवारातील  प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

प्राचार्य अमोल गायकवाड यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सूत्रसंचलन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन सचिव प्रशांत मस्के यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *