सांगोला (प्रतिनिधी) :-
खेळामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो तसेच व्यक्तिमत्व प्रगल्भ होते हा विचार प्रमाण म्हणून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी कै. गुरुवर्य बापूसाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेली ४४ वर्षे राज्यस्तरीय व मागील वर्षापासून राष्ट्रीय पुरुषांच्या निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे केले जात आहे. या स्पर्धेतील खेळाडूंचे कौशल्य पाहता. आपल्या परिसरातील खेळाडूंना कौशल्य प्राप्त होण्यासाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी शिस्तबद्ध प्रशिक्षणाची गरज आहे हा विचार प्रमाण मानून सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमी सांगोला शहर व तालुका बास्केटबॉल असोसिएशन संलग्न सुरूवात दोन इनडोअर कोर्ट मध्ये करण्यात येत आहे.
संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरुवात व प्रजासत्ताकदिनी उद्घाटन –
सन २०२६ २७ हे वर्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला व सांगोला विद्यामंदिर सांगोला अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला या अकॅडमीची सुरुवात व भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी कर्णधार व विद्यमान प्रशिक्षक संभाजी कदम यांचे शुभ हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे उपस्थितीत सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० वा. सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे सहभागी व्हावे असे आवाहन संपन्न होत आहे. तरी परिसरातील सर्व क्रीडाप्रेमी, खेळाडू, नागरिक यांनी उपस्थित राहावे व जास्तीत जास्त खेळाडूंनी अकॅडमी मध्ये बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमी कडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रशांत मस्के- ९८२२०३१८८८,
अजित मोरे – ९५०३८०७०८०
- अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये-
- आधुनिक कोर्ट: आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आलेले दोन आधुनिक बास्केटबॉल कोर्ट.
- तज्ज्ञ प्रशिक्षक : अनुभवी प्रशिक्षकांकडून (N.I.S. Coach) वैयक्तिक मार्गदर्शन.
- फिटनेस ट्रेनिंग: खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसाठी विशेष व्यायाम आणि डाएट प्लॅन.
- सर्व वयोगटांसाठी सोय- ५ वर्षावरील मुला-मुलींसाठी वेगवेगळे बॅचेस
