सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा माजी विद्यार्थी व सांगोल्यातील प्रसिद्ध विधीज्ञ श्री.उदय बापू घोंगडे यांचे चिरंजीव कै.आकाश उर्फ प्रणव उदय घोंगडे याच्या 16व्या स्मृतीदिनानिमित्त आज सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप व सायकल बँकेस सायकल प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. नरेंद्र गंभीरे (चेअरमन, सिद्धेश्वर बँक सोलापूर), मा.आण्णासाहेब कोथली (शतकवीर रक्तदाते) व मा. श्री. आनंद घोंगडे (प्रसिद्ध उद्योगपती, सांगोला) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके (अध्यक्ष, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला) होते.
कार्यक्रमाची सुरुवात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री. चिंतामणी देशपांडे (उपमुख्याध्यापक, सांगोला विद्यामंदिर प्रशाला) यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.मा.आण्णासाहेब कोथली यांनी आपल्या मनोगतातून कै.प्रणव ऊर्फ आकाश घोंगडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त होत असलेला हा सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
मा. नरेंद्र गंभीरे यांनी सांगितले की, कै. प्रणव ऊर्फ आकाश यांच्या स्मृती जपण्यासाठी उदयबापू घोंगडे व घोंगडे परिवाराकडून गरजू व होतकरू 25 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या सायकल बँकेस 10 सायकलींचे प्रदान हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी सभ्य, जबाबदार व समाजाभिमुख नागरिक म्हणून पुढे वाटचाल करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले व या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या सायकल बँकेस 02 सायकली देण्याचे जाहीर केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी कै. आकाश ऊर्फ प्रणव यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करत, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपले अध्यक्षीय मनोगत मांडले.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. उत्तम सरगर सर, श्री. प्रदीप धुकटे सर, प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव विभाग प्रमुख श्री. नरेंद्र होनराव व श्री. राजेंद्र ढोले सर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन श्री. वैभव कोठावळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. काकासाहेब नरुटे (पर्यवेक्षक, सांगोला विद्यामंदिर प्रशाला) यांनी केले.
कै. प्रणव ऊर्फ आकाश घोंगडे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
