सांगोला / प्रतिनिधी
सांगोला शहरातील सर्वात लक्षवेधी मानल्या जाणाऱ्या प्रभाग १० मधील निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे चिटणीस मानस कमलापुरकर यांच्या पत्नी प्रिया कमलापूरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता अखेर त्यांनी आपला पाठिंबा वैशाली झपके आणि समीर पाटील यांना जाहीर केल्याने प्रभाग १० मध्ये सांगोला शहर विकास आघाडीचे पारडे जड झाले आहे.
सांगोला शहर विकास आघाडीचे उमेदवार समीर साहेबराव पाटील आणि वैशाली सिद्धार्ध झपके यांनी प्रभागात प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून प्रभागातील घरोघरी जाऊन ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन तरुणांना साद घातली आहे. समीर पाटील आणि वैशाली सिद्धार्ध झपके यांच्या प्रचार पद यात्रेस प्रभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मानस कमलापुरकर हे गेली १५ वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात सक्रीय आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते सांगोला शहर आणि तालुक्यात सक्रीय आहेत. प्रभाग १० मध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांनी समीर साहेबराव पाटील आणि वैशाली सिद्धार्ध झपके यांना आपला पाठींबा दिल्याने या प्रभागातून सांगोला शहर विकास आघाडीच्या समीर पाटील आणि वैशाली झपके या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
