IMG 20260312 204116 scaled

सांगोला: शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश प्राप्त करत यशाची परंपरा राखत जिल्ह्यात नावलौकिक केला आहे.

या परीक्षेत प्रविष्ट एकूण विद्यार्थी 202 पैकी 173 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 150 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 03 विद्यार्थी, 140 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 18 विद्यार्थी, 130 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 35 विद्यार्थी, 120 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 63 विद्यार्थी, 110 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 99 विद्यार्थी तर 100 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 128 विद्यार्थी आहेत.

कुमारी सुबोधिनी गुंडोपंत इंगवले हिने 156 गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे.

सदर विद्यार्थ्यांना NMMS विभागातील सर्व मार्गदर्शक शिक्षकांसह विभाग प्रमुख निलेश जंगम, संस्था बाह्यपरीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे, प्रशाला बाह्यपरीक्षा विभागप्रमुख सिताराम राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

या उज्वल यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष आदरणीय प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्था उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह चव्हाण, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेशजी झपके, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, विभागनियंत्रक व पर्यवेक्षक प्रदिप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर परीक्षेची शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध होणार असून सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या परंपरेप्रमाणे प्रतिवर्षी विद्यार्थी NMMS परीक्षेमधून जवळपास 50 लाखांच्या आसपास शासकीय शिष्यवृत्ती संपादन करत असतात ही एक उल्लेखनीय बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Missed Section